Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! इराणचा भारताला पहिला धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, सर्वात मोठी घोषणा

Big Breaking! इराणचा भारताला पहिला धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, सर्वात मोठी घोषणा


युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर मोठा हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इरानने देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मध्य पूर्वेमधून मोठी बातमी समोर येत आहे. इराणकडून काही दिवसांपूर्वीच होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनी बाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

फक्त चीनी जहाजांनाच या जलमार्गने वाहतूक करण्याची परवानगी इराणने दिली आहे. तर दुसरं कोणतंही जहाज या मार्गाने गेलं तर आम्ही त्यावर हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे. याबाबत बोलताना इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) च्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिमी राष्ट्रांमधील तसेच त्यांचे सहकारी असलेल्या देशांमधील जहाजांना आम्ही या मार्गाने जाऊ देणार नाही. 

चीन सोडून इतर कोणत्याही जहाने या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल तर आम्ही त्या जहाजावर हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे. दरम्यान हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण भारत आपल्या कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात वाहतूक ही या सामुद्रधुनीमधून करतो. त्यामुळे आता ही सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात भारताला बसू शकतो. देशात इंधन टंचाई देखील निर्माण होऊ शकते. इराने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

तर दुसरीकडे मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केला आहे. अमेरिकेचे सैनिक या मार्गाला संरक्षण पुरवतील, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही या मार्गाने सुरू असलेली तेलाची वाहतूक खंडीत होऊ देणार नाही, जगात कुठेही इंधन तुटवडा जाणून देणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.