होळीला श्रीमंताचा मोलकरणीवर अतिप्रसंग, सासरच्या विरोधात गेलेल्या सुनेला पाठिंबा, Sunny Deol ला दामिनीसाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड
होळीचा सणांना बॉलीवूड गाण्यांची नेहमीच धूम असते. वेगवेगळ्या गाण्यांच्या ठेक्यावर लोक नाचत असतात. बॉलीवूडमध्ये होळीवर, धुळवडीवर अनेक गाणी तयार झाली आहेत पण आज आपण एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये होळीच्या रंगांआड श्रीमंत लोक एका मोलकरणीवर अतिप्रसंग करतात. येथूनच चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते. दामिनी असे या सिनेमाचे नाव. सनी देओल, ऋषी कपूर आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या सिनेमात दमदार भूमिका आहेत. तर अमरीश पुरी यांनी बॅरिस्टर इंद्रजित चड्ढा यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. शिवाय आमिर खान देखील एका खास भूमिकेत दिसला. ही कथा दामिनीभोवती म्हणजेच मीनाक्षी शेषाद्रींभोवतो फिरते. हा एख स्त्रीवादी सिनेमा आहे.
घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर अतिप्रसंद
1993 मध्ये राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मीनाक्षी यांनी ऋषी कपूरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. होळीच्या सणात सर्वजण रंगांमध्ये न्हावून निघालेले असतात. तेव्हा शेखरचा म्हणजे ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ राकेश आणि त्याचे मित्र घरकाम करणाऱ्या उर्मीवर अतिप्रसंग करतात. दामिनी ते सर्व पाहते आणि शेखरला मदतीसाठी बोलावते. पण खूप उशीर झाला आहे, कारण राकेश आणि त्याच्या मित्रांनी उर्मीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिला आहे.
कुटुंबाच्या सन्मानासमोर सत्याचा सामना
त्यानंतर दामिनीची कहाणी सुरू होते, जिथे ती तिच्या कुटुंबाच्या सन्मानाविरुद्ध सत्याचा सामना करते. जेव्हा पोलीस चौकशीसाठी येतात तेव्हा दामिनीचे सासरचे लोक तिला तिच्या कुटुंबाच्या सन्मानासाठी तोंड बंद ठेवायला सांगतात. पण सत्य माहित असूनही शांत बसणे तिला जमत नसते त्यामुळे ती अस्वस्थ होते. त्यानंतर ती उर्मीसाठी एकटीच उभी राहते, तिला माहित असतं की फक्त तीच आहे जी तिला न्याय मिळवून देऊ शकते.
बचावासाठी बॅरिस्टर चड्डा यांची मदत
दामिनी इन्स्पेक्टर रतन (विजयेंद्र घाटगे) यांच्यासमोर सत्य कबूल करते आणि न्यायालयात साक्ष देण्यास तयार होते. या निर्णयामुळे तिच्या सासरच्यांना राग येतो, त्यांना ती विश्वासघातकी वाटते. कुटुंबाविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल केला जातो आणि गुप्ता कुटुंब त्यांच्या बचावासाठी बॅरिस्टर चड्डा (अमरीश पुरी) यांना नियुक्त करतात.दामिनी मानसिक रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी यानंतर, बॅरिस्टर इंद्रजित चड्डा दामिनीला चुकीचे सिद्ध करण्यासाठी चाल खेळतात. त्यामुळे सर्वांना ती खोटी वाटू लागते. त्यानंतर दामिनीला दोन आठवड्यांसाठी मानसिक रुग्णालयात पाठवले जाते, जिथे तिच्या डोक्याला दुखापत होते आणि तिची प्रकृती बिघडते. पण, दामिनी पळून जाण्यात यशस्वी होते. या काळात तिला निवृत्त आणि निराश वकील गोविंद (सनी देओल) भेटतो, जो तिला तिचा खटला लढण्यास मदत करतो.
सनी देओलला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार
30 एप्रिल 1993 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळाली. वकिलाच्या भूमिकेसाठी सनी देओलला 1993 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटातले त्याचे "तारिख पे तारीख" आणि "ढाई किलो का हाथ" हे डॉयलॉग प्रसिद्ध झाले. केवळ सनी देओलसाठीच नाही तर मीनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी यांच्या कारकिर्दीतील हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरला. सिनेमाचे बजेट आणि कमाई असे म्हटले जाते की साधारण 2.30 कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने सुमारे 12 कोटींची कमाई केली. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि यूट्यूबवर सबस्क्रिप्शनसह पाहू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
