अपघात घडवून पळणाऱ्याला 'दामिणी'चा दणका; कल्याणमध्ये आरोपीचा थरारक पाठलाग
दुचाकीचालक महेश एलमारे हे मुरबाड रोडवरून सुभाष चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी कारची एलमारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यामुळे ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. याचदरम्यान महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या दामिनी पोलिस पथकाच्या महिला कर्मचारी संजना पावसकर आणि कोमल धनगर या गस्त घालत असताना त्यांची नजर या अपघाताकडे गेली. त्यांनी एक किलोमीटरचा पाठलाग करून कार चालक राजनसिंग चंदेल आणि त्याच्या साथीदाराला पकडले. या दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातात जखमी झालेल्या एलमारे याला कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या या कामगिरीेच कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
