Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू ? स्टेट मीडियाच्या दाव्याने खळबळ

Big Breaking! इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू ? स्टेट मीडियाच्या दाव्याने खळबळ


इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्भवभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु आहे. इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या एका व्हिडीओमुळे या चर्चेला तोंड फुटलं आहे. एक्स (आधीचं ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील हजारो युझर्सने नेतन्याहू यांचा सध्या चर्चेत असलेला व्हिडीओ एआय वापरुन तयार करण्यात आला आहे किंवा त्यासोबत छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ सध्या ऑनलाइन माध्यमांवर चर्चेचा विषय ठरतोय.

काय आहे व्हायरल इमेजमध्ये?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या स्क्रीनशॉटमध्ये तसेच स्लो मोशन फ्रेम बाय फ्रेम व्हिडीओचं विश्लेषण करुन अनेकांनी व्हिडीओ एआयच्या माध्यमातून तयार केल्याचा दावा केला आहे. अनेकांनी नेतन्याहू यांच्या हाताला सहा बोटं दिसत असल्याचं म्हटलं आहे. काहींनी हे तांत्रिक अडचणीमुळे भास होत असल्याने वाटतंय असा दावा केलाय. मात्र याच चर्चांमुळे हा व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकजण इस्रायली पंतप्रधानांच्या व्हिडीओ क्लिपमधील बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष वेधताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील एक फ्रेम प्रचंड चर्चेत आहे. या फ्रेमच्या स्क्रीनशॉटमध्ये नेतन्याहू यांचा हात मायक्रोफोनजवळ जातो तेव्हा गायब झाल्यासारखा दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओत नेतन्याहू यांना सहा बोटं असल्याचं दिसत आहे असं म्हटलं आहे.

सहा बोटं दिसण्याचा अर्थ काय?

अशाप्रकारे सहा बोटं दिसणे हे सदर फोटो किंवा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून बनवण्यात आल्याचं सूचित करतं. यापूर्वीही अनेक उदाहरणांमध्ये एआयला मानवी हात तयार करुन तो वेगाने हलचाली होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दाखवता येत नसल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळेच अशाप्रकारे बोटांच्या हलचाली संशयास्पद वाटणे हे सिथेटीक इमेज किंवा एआय व्हिडीओचं लक्षण असल्याचं मानलं जातं.

सोशल मीडियावर ट्विटबरोबरच इन्स्राग्राम पोस्टमध्ये ही अनेकांनी या व्हिडीओच्या फ्रेममधील स्क्रीनशॉट शेअर केला आङे. यामध्ये स्क्रीन झूम करुन बाणांच्या सहाय्याने बोटांची रचना कशी विचित्र आहे हे दाखवण्यात आलं आहे. "हाताकडे काळजीपूर्वक पाहा", "हा एक क्लासिक एआय फिगर क्लिच आहे," किंवा "हा व्हिडीओ सिंथेटीक आहे," असं अन्य एकाने म्हटलं आहे. हा व्हिडीओ जगभरात चर्चेत आहे.

का दाखवण्यात आला असेल हा व्हिडीओ?
अनेकांनी हा व्हिडीओ डिजीटल प्रोपोगांडाचा भाग असल्याचा दावा केला आहे. सध्या सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू स्वत: लाइव्ह येऊन बोलत असल्याचं भासवण्यासाठी तो तयार करण्यात आला असावा असंही काहींनी म्हटलं आहे. काहींनीयापुढे जाऊन राजकीय नेते अशाप्रकारे स्वत:चे एआय अवतार वापरत असल्याचं यावरुन सिद्ध होत आहे अशं म्हटलं आहे. काहींनी तर, "इस्रायल सरकारने जारी केलेला व्हिडीओ एआयचा वापर करुन बनवला आहे. कारण नेतन्याहू यांना सहा बोटं दिसत आहेत. नेतन्याहू यांचा मृत्यू झाला आहे का?" अशी विचारणाही केली आहे.
फोटोही झालाय व्हायरल, पण...

"हे खरंच घडलंय का? इस्रायलने नेतन्याहू यांचं एआय भाषण का चालवलं? यामध्ये पंतप्रधानांची सहा बोटं स्पष्टपणे दिसत आहेत, असं का? नेतन्याहू कुठे आहेत?" अशा सवाल अन्य एकाने विचारला आहे. असाच नेतन्याहू यांचा एक डीप फेक फोटोही व्हायरल होत असून त्यांना युद्धादरम्यान मृत अवस्थेत पकडण्यात आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न फोटोत केला आहे. फोटोमध्ये धूळ लागलेल्या अवस्थेत नेतन्याहू जणू बेशुद्ध पडल्याप्रमाणेच दिसत असून त्यांना उचललं जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

एआय फोटो कसं सिद्ध होतं?
मात्र हा फोटो एआय तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आला आहे. फोटोमध्ये नेत्याहून यांचा चेहरा स्पष्ट दिसावा अशीच धूळ लागलेली आहे. फोटोमधील दावे आणि फोटो याचा ताळमेळ लागत नाहीये. बरोबर चेहरा दिसावा अशा अर्थाने धूळ लागलेली नसल्यावरुनच हा फोटो खोटा असल्याचं स्पष्ट होतंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.