Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बहिणीसाठी भाऊ बनला काळ! छेड काढणाऱ्या टोळीवर झाडल्या गोळ्या; एकाचा जागीच मृत्यू.

बहिणीसाठी भाऊ बनला काळ! छेड काढणाऱ्या टोळीवर झाडल्या गोळ्या; एकाचा जागीच मृत्यू.


ठाण्यातील मुंब्रा परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बहिणीची छेड काढल्याचा रागातून मानलेल्या भावाने थेट गोळीबार केला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्यातील सुमनताई चव्हाण हिंदी शाळेच्या परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. अकबर शेख असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर अब्दुल शेख आणि समीर शेख असं जखमी झालेल्या दोघांचं नाव आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून अकबर शेख, अब्दुल शेख आणि समीर शेख हे तिघे जण आरोपीच्या मानलेल्या बहिणीची वारंवार छेड काढत होते. आरोपींचा त्रास वाढत गेल्यानंतर तरुणी याबाबतची माहिती आपल्या मानलेल्या भावाला दिली. यानंतर आरोपी भावाने छेड काढणाऱ्यांच बदला घेण्याचा कट रचला.
यातूनच आरोपी भावाने अकबर शेख, अब्दुल शेख आणि समीर शेख तिघेही शाळेच्या परिसरात असताना यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात अकबर शेख याचा जागीच मृत्यू झाला. तर, अब्दुल शेख आणि समीर शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.