Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे पोलिसांचा 'अ‍ॅक्शन मोड'; १२ दिवसांत १६६ गुन्हे, गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

पुणे पोलिसांचा 'अ‍ॅक्शन मोड'; १२ दिवसांत १६६ गुन्हे, गुन्हेगारांचे धाबे दणाणले!


पुणे: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, अमली पदार्थ आणि दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ‌'ऑपरेशन फ्लश आऊट‌'ला वेग आला आहे.

20 ते 31 मार्च या 12 दिवसांच्या कालावधीत एकूण 166 गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान बेकायदा बाळगणाऱ्यांविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत 29 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अमली पदार्थांच्या विक्री व साठ्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये 13 गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवायांमुळे गुन्हेगारी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध दारू विक्रीविरोधातही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत 31 मार्चपर्यंत 166 गुन्हे दाखल केले. या प्रकरणांमध्ये 134 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, सुमारे 5 लाख 81 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त मालामध्ये 2 हजार 199.9 लिटर गावठी दारू, 108.58 लिटर विदेशी दारू, 40 लिटर ताडी व 20 लिटर रसायनाचा समावेश आहे. याशिवाय 1,337 दारूच्या बाटल्या तसेच 153 गुटखा व तंबाखूची पाकिटेही जप्त करण्यात आली. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर तसेच अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या अवैध हातगाड्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये 195 व्यक्ती व हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

अमितेश कुमार, पोलिस आयुक्त‌'ऑपरेशन फ्लश आऊट‌' या मोहिमेत 166 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून त्यांच्या परिसरात अवैध शस्त्रे, अमली पदार्थ किंवा दारू विक्री होत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.