देशातील प्रीमियम ट्रेन म्हणून ओळख असलेली वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या रेल्वेत दिल्या जाणाऱ्या अन्नामुळे एका माझी प्रकृती बिघडली तसेच माझ्या मुलगाही आजारी पडला, असा दावा या महिलेने केला आहे.
या महिलेने सोशल मीडियावर सुजलेल्या ओठांसह आपला फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे देशभरात वंदे भारत रेल्वेत दिल्या जाणाऱ्या अन्नाविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या महिलेने केलेल्या दाव्यानंतर आयआरसीटीसीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेनमधील जेवण खाल्ल्याने प्रकृती बिघडल्याचा दावा करणाऱ्या महिलेचे नाव आयुषी असे आहे. ही महिला 27 मार्च रोजी 22500 या क्रमांकाच्या ट्रेनमध्ये E1 या डब्यात आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होती. यावेळी या महिलेने रेल्वेत दिले जाणारे अन्न खाल्ले. त्यानंतर मला अॅलर्जी झाली आणि माझे ओठ खूप सुजले, असा दावा या महिलेने केला आहे. सोबतच माझ्या मुलालाही जुलाब झाले, असेही या महिलेने म्हटले आहे. या महिलेने रेल्वेत पिण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी वेळेवर रुग्णालयात गेली नसते, तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती, असं या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
IRCTC ने घेतली दखल, चौकशी होणार
दुसरीकडे महिलेने केलेल्या या दाव्याची आयआरसीटीसीने दखल घेतली आहे. या तक्रारीनंतर आम्ही ट्रेनमधील अन्नाची चाणी केली. ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता चांगली होती. सोबतच त्या रेल्वेत प्रवास करणाऱ्या अन्य कोणत्याही प्रवाशाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार केलेली नाही, असे आयआरसीटीसीने सांगितले आहे. IRCTC ने संबंधित महिलेकडे या प्रकरणाची अधिक माहिती मागवली आहे. तसेच आम्ही या प्रकरणी सखोल चौकशी आणि तपास करू, असेही आश्वासन IRCTC ने दिले आहे. दरम्यान, याआधीही वंदे भारत रेल्वेत दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेत. आता ही नवी तक्रार आल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.