Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"दमानियांच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी काळं-बेरं नक्कीच!" - सुषमा अंधारेंचा घणाघात

​"दमानियांच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी काळं-बेरं नक्कीच!" - सुषमा अंधारेंचा घणाघात


अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमिनाया यांनी मोबाईल फोनचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, विरोधक इतक्यांदा मागणी करुनही त्यांना सीडीआर मिळत नाहीत. मग अंजली दमानिया यांना ही सगळी माहिती कोण पुरवते? विशेष म्हणजे अंजली दमानिया  यांनी बाहेर काढलेल्या सीडीआर रेकॉर्डच्या यादीत भाजपच्या  एका नेत्याचाही समावेश कसा नाही?, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे  यांनी उपस्थित केला. त्या शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणात सीडीआर डेटा बाहेर काढला, ही चांगली गोष्ट आहे. पण अंजली दमानियांकडे हे सीडीआर रेकॉर्ड आले कुठून, हा एकच प्रश्न आम्हाला पडतो. अंजली दमानिया म्हणतात की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात याला 17 कॉल केले होते. या सगळ्याचा इनकमिंग आणि आऊटगोईंग रेकॉर्डही आणि हे कॉल कधी केले होते, कॉल ड्युरेशची माहितीही समोर आली पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला 17 कॉल केले तेव्हा त्याचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे. पण ज्यांनी अशोक खरात याच्या इशान्येश्वर मंदिला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा सुशोभीकरणाचा निधी मंजूर केला. त्यांचा एकही कॉल रेकॉर्ड सापडला नाही का? अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेल्या सीडीआर रेकॉर्डसमध्ये भाजपच्या एका माणसाचाही कॉल नाही. काहीतरी गडबड सुरु आहे. भाजपच्या कोणत्या नेत्यांनी खरात याला कॉल केला किंव नाही, याचा शोध घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
याप्रकरणात तपासाला इतके दिवस होऊनही एसआयटीकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. अशोक खरात याचे सीडीआर आणि संपत्तीची तपासणी करावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शिवानिक ट्रस्टच्या सदस्यांनी तपासणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. मग गमे, आवारे, पोफळे यांना का ताब्यात घेण्यात आले नाही. भांडे नावाच अधिकारी एसआरए खात्यात का गेला होता?, असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
रुपाली चाकणकरांना आताच कंठ कसा फुटला, त्या तपास यंत्रणांना मॅनेज करतात का? अंधारेंचा सवाल  अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या चौकशीचे समन्स निघाल्याची चर्चा होती. पण त्यांनी तीन दिवस मौन बाळगले. त्यानंतर त्यांना कंठ फुटला. या तीन दिवसांत रुपाली चाकणकर यांनी तपास यंत्रणा मॅनेज केल्या का? या माध्यमातून चाकणकर तपास यंत्रणा माझ्याच हातात आहेत, मी एसआयटीला गुंडाळू शकते, हे सांगू पाहत आहेत का?, असा सवाल अंधारे यांनी विचारला.
अंजली दमानिया प्रत्येकवेळी सरकारी गोपनीय माहिती बाहेर काढतात. एसआयटीकडून माहिती येत नाही दमामियाकंडून येते. याचा अर्थ प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं नाही, फक्त काही लोक डॅमेज करायची आहेत, असा हेतू आहे का? या प्रकरणात महाराष्ट्रातील लेकींच्या अब्रुशी खेळले गेले आहे, त्यांना गजाआड पाठवणे महत्त्वाचे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. फक्त रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करुनही चालणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.