Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"विलीनीकरणाचा प्लॅन मला आधीच ठाऊक होता!" सुनील तटकरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

​"विलीनीकरणाचा प्लॅन मला आधीच ठाऊक होता!" सुनील तटकरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ


“दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतची माहिती मला आधीपासूनच होती,” असे विधान करत प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मोठे भाष्य केले आहे. पण तटकरेंच्या या विधानाने मात्र राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनी करणाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात होते. पण हळूहळू विलीनीकरणाच्या चर्चांवर पडदा पडू लागला. पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा मागे पडली असतानाच सुनील तटकरे यांच्या या विधानाने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?
‘माझा विलीनीकरणाला विरोध होता अशातला काही भाग नाही. मला त्या गोष्टीची आधी माहिती होती. पण अजितदांदांच्या अपघाती निधाने विलीनीकरणाच्या संभाव्या परिस्थिती बदलल्या. पहिले तीन दिवस तर मी माध्यमांशी काही बोलूच शकलो नाही. विलिनीकरण करू, वहिनींना नेता निवडा, असे त्यांनी म्हटले नाही.’

‘आपण पाहिलं असेल तर दादांनी ज्यावेळी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आता जे दादांवर प्रेम असल्याचे बोलत आहेत, त्यांनीच दादांवर एकेरी भाषेत टिका केली होती. लोकसभा निवडणूक हरल्यानंतरही राजकीयदृष्ट्या दादा संपल्याचीही अनेकांनी वल्गना केल्या. पण आता त्यावर बोलण्याची वेळ नाही. पण वेळ आल्यावर मी नक्की बोलेन. असंही तटकरे यांनी सांगितलं.

तटकरे म्हणाले की, अजितदादांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवले होते. पहिल्याच दिवशी काही जबाबदार नेत्यांनीच विलीनीकरणाबाबत प्रतिक्रीय दिल्या होत्या. विलीनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं, सर्व चर्चा झाल्या होत्या, या तारखेला विलीनीकरण होणार होतं.” असं सांगितलं गेलं. त्यानंतर दादा आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र बैठकीा बसलेत, असा व्हिडीओ सलग दोन दिवस व्हायरल झाला. त्यामुळे आम्ही सगळेच हादरलो होतो. असंही तटकरेनी नमुद केलं.
राजकीय अर्थ आणि खळबळ

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पक्षाचे नेतृत्व कोण करणार आणि शरद पवार यांच्याशी असलेले संबंध सुधारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तटकरेंच्या या विधानामुळे, विलीनीकरण कधी होणार? जर चर्चा आधीपासून सुरू होती, तर आता अधिकृत घोषणा कधी होणार? नेतृत्व कोणाकडे? विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार की शरद पवार पुन्हा सर्व सूत्रे हाती घेणार, असे सवाल उपस्थित होत आहे.

पक्षांतर्गत गोंधळ
एककीडे काही आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक असताना आणि दुसरीकडे विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. सुनील तटकरे यांचे हे ‘सूचक विधान’ आगामी काळात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मानले जात आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. विलीनीकरणाच्या प्रक्रियेची आपल्याला आधीपासूनच कल्पना होती, मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सर्व परिस्थिती बदलली, असे तटकरे यांनी म्हटले आहे. या विधानामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.”

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.