🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पडद्यामागे वेगळीच खेळी! बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी 'ते' दोन शिलेदार शांत का?

पडद्यामागे वेगळीच खेळी! बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी 'ते' दोन शिलेदार शांत का?


बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने बारातमीत उमेदवारी दिली होती. आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसेच्या नेत्यांनी आणि सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसोबत संपर्क केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनाही काँग्रेससोबत संपर्क करून उमेदवारी मागे घेण्याबाबत संपर्क साधला होता. 
पण सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील उमेदवारी काँग्रेसने माघार घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांनी पटेल तटकरे यांनी अर्ज माघारीसाठी कोणताही संपर्क केला नसल्याचे म्हटले आहे. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस नेत्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय. सुनेत्रा पवारांशिवाय आमच्याशी कोणत्याच नेत्यांनी संपर्क केला नाही, केवळ सुनेत्रा पवारांनीच दोनदा फोन केला, असे थेट आरोप काँग्रेस नेत्यांनी म्हटलेय. दुसरीकडे काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्यानंतर सुनील तटकरे यांनी त्यांचे आभार मानले, त्यांच्या निर्णायाचे स्वागत केले. काँग्रेसला समजवण्यात आम्ही कुठेच कमी पडलो नाही. शेवट गोड झाला तर सर्व काही विसरून जायला हवं, असे तटकरे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अनेकांचे फोन आले. पुण्यातून सुनेत्रा पवार यांचाही फोन होता. या निवडणुकीत पुढे जाणार आहेत थांबवावं अशी भूमिका आणि भावना दिसली, त्यामुळे आमच्या नेत्यांचे एकमत झालं आहे. एखाद्या विद्यमान एमपी किंवा आमदाराचे कुटुंबाकडे बघतो त्यामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा प्रयत्न असतो, असे वडेट्टीवार म्हणाले.

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पान भाजपशिवाय हालत नाही, अशी चर्चा महाराष्ट्रात सर्व दूर होती आणि आजही आहे. त्यामुळे काल-परवा जे कार्य करणे झाले, त्यामध्ये या दोघांना अजूनही महत्त्वाचे पद राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं गेलं नाही. काही वेळेपासून, दादांपासून दुरावत चालले होते हे त्यांचेच नेते म्हणतात. कदाचित आजही ती भावना असू शकत., मी आज बोलणार नाही पण राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत असलेल्या धुसफूस संदर्भात काँग्रेस म्हणून बोलण्याचा अधिकार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
सुनेत्रा ताई पवार यांच्या निवड बिनविरोध होण्यासाठी यांनी कोणीच कोणाला फोन केले नाही, कदाचित त्यांना माहीत असेल की आपला फोन कोणी ऐकणार नाही. सुनेत्रा ताईंनी आमचं महत्त्व कमी केलं, त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची, असे म्हणत वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.