सांगली:- दैनिक ललकारचे संपादक सुभाष खराडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुणा खराडे यांचा संयुक्तपणे वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या उभयतांना शुभेच्छा दिल्या.
शामरावनगर मधील सिंधी पुरुषार्थ सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या या समारंभाला समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. दैनिक ललकारची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळत संपादक सुभाष खराडे यांनी समाजातील सर्वच घटकाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.👍🏻त्यांचे चिरंजीव ऋषिकेश, आणि अमरनाथ व सुनबाई सौ. वेदिका खराडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या उभयतांनी केक कापला. त्यावेळी टाळ्यांच्या गजरात हॅपी बर्थडे चा नारा दुमदुमला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.