कॅन्सर, डायबिटीज कधीच जवळ येणार नाही; फक्त 'या' फळाचं पान खा, ब्लड शुगरही होईल कमी
आयुर्वेद हे वैद्यकशास्त्रासाठी एक वरदान आहे. आयुर्वेदात दिलेले उपचार कोणत्याही रोगाला मुळापासून नष्ट करतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे दुष्परिणाम नगण्य असतात. वास्तविक पाहता, आयुर्वेदिक पद्धतीनुसार उपचार आपल्या आजूबाजूलाच उपलब्ध असतात. कधीकधी काही गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, पण आपल्याला त्याची जाणीवही नसते. अशीच एक वनस्पती म्हणजे सीताफळ. सीताफळाची वनस्पती भारताच्या बहुतेक भागांमध्ये आढळते. सीताफळ खायला जितके स्वादिष्ट आहे, तितकेच ते औषधीही आहे. एनसीबीआयच्या (NCBI) शोधनिबंधात असा दावा करण्यात आला आहे की, सीताफळाच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. जर त्याचे नियमित सेवन केले तर रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी होते.
संशोधनाने काय सिद्ध केले आहे
एनसीबीआयच्या मते, वनस्पती औषधांचा एक मौल्यवान स्रोत आहेत. अनेक वनस्पतींपासून औषधे बनवली जातात. त्यांच्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, सुमारे ८०० प्रकारच्या वनस्पतींमध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात. काही वनस्पतींच्या मुळांमध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात, तर काहींच्या पानांमध्ये असतात. काही फळे किंवा वनस्पतींपासून मिळणाऱ्या इतर पदार्थांमध्येही मधुमेह-विरोधी औषधे असू शकतात. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, सीताफळाच्या पानांचा वापर टाईप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. अभ्यासात असे आढळून आले आहे की, या वनस्पतींमध्ये अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, गॅलॅक्टोमॅनॅन, पॉलिसॅकराइड्स, पेप्टिडोग्लायकान्स, हायपोग्लायकान्स, ग्वानिडिन, स्टिरॉइड्स, कार्बोहायड्रेट्स, ग्लायकोपेप्टाइड्स, टर्पेनॉइड्स आणि अमिनो ॲसिड्स यांसारखी संयुगे असतात, जी टाईप २ मधुमेहासाठी आणि कर्करोगाच्या उपचारासाठी खूप फायदेशीर आहेत.
इन्सुलिनची पातळी वाढवते
एनसीबीआयच्या एका शोधनिबंधानुसार, सीताफळाच्या पानांमध्ये आढळणारे मधुमेह-विरोधी गुणधर्म थेट स्वादुपिंडावर परिणाम करतात. वास्तविक पाहता, स्वादुपिंडातून इन्सुलिन नावाचा एक हार्मोन स्रवतो. जेव्हा हा हार्मोन स्रवतो, तेव्हा तो रक्तातील ग्लुकोज शोषून घेतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर इन्सुलिन ग्लुकोज पचवते आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. संशोधनानुसार, सीताफळाची पाने प्लाझ्मा इन्सुलिनची पातळी वाढवतात. ज्यामुळे इन्सुलिन रक्तात जास्त काळ टिकून राहते आणि ते ग्लुकोज शोषून त्याचे ऊर्जेत रूपांतर करते, त्यामुळे जर सकाळी लवकर सीताफळाची पाने चावली तर इन्सुलिनचे प्रमाण दिवसभर टिकून राहील, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही.
सीताफळ आहे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध
सीताफळ अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात, जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी मदत करतात. फ्री रॅडिकल्सच्या उच्च पातळीमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होऊ शकतो, जो कर्करोग आणि हृदयरोगासह अनेक जुनाट आजारांशी संबंधित आहे. फळाची सालीतील संयुगे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासाठी विशेषतः प्रभावी आहेत. पण लक्षात घ्या की, आरोग्याच्या काही समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे सीताफळाची साल खाऊ नये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.