🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"बांगलादेशात हिंदूंची अवस्था गंभीर"; मदरशांविषयी तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त विधान

"बांगलादेशात हिंदूंची अवस्था गंभीर"; मदरशांविषयी तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त विधान


तस्लीमा नसरीन यांनी कोलकातामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी बोलताना बांगलादेशातील हिंदूंबाबत चिंता व्यक्त केली. तसंच त्या म्हणाल्या की बांगलादेशात हिंदू महिलांकडे त्यांचे मूलभूत अधिकार नाहीत. तसंच त्यांना वारस ठरवण्याचाही अधिकार नाही. बांगलादेशातील हिंदूंची अवस्था बिकट आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या तस्लीमा नसरीन?
बांगलादेशात १९५६ च्या हिंदू कायद्याची अंमलबजावणी पुन्हा एकदा केली जाण्याची गरज आहे. तसंच त्या युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबतही बोलल्या. तस्लीमा नसरीन म्हणाल्या एक देश एक कायद्याच्या चर्चा आपण करतो. त्यामुळे महिलांसाठीही कायदा समान असला पाहिजे. त्यांना महत्त्व मिळालं पाहिजे. बांगलादेशात यूसीसी सारखा कायदा आला तर महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळतील. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बेगम खलिदा जिया आणि मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळातही अशा घटना घडल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. यानंतर त्यांना मदरशांबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्याचंही उत्तर दिलं.
मदरशांबाबत तस्लीमा नसरीन काय म्हणाल्या?

तस्लीमा नसरीन मदरशांबाबतच्या प्रश्नाबाबत म्हणाल्या की त्या ठिकाणी म्हणजेच मदराशांमध्ये फक्त जिहादी जन्माला घातले जातात. सगळ्या मदरशांचं रुपांतर हे धर्मनिरपेक्ष शाळांमध्ये केलं गेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बांगलादेशात खुल्या विचारांचे लोक राहू शकत नाही आजही त्यांच्यावर पलायन करण्याची वेळ येते ही बाब दुर्दैवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच बांगलादेशात शेख हसीना यांनी परतलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

भाजपा सरकारचे तस्लीमा नसरीन यांनी मानले आभार
१९ वर्षांनी तस्लीमा नसरीन एका कार्यक्रमासाठी कोलकाता या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी कोलकाता भेटीचं श्रेय भाजपा सरकारला दिलं. त्या म्हणाल्या एक काळ असा होता असं सरकार होतं की त्यांच्या कार्यकाळात मला बंगालमधून हाकलून दण्यात आलं. त्यानंतर सरकार बदललं पण मला प्रवेश दिला गेला नाही. आता तिसरं सरकार आलं आहे आणि बदल पाहण्यास मिळतो आहे. या बदलाच्या काळात मला कोलकाता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. भाजपाच्या राजवटीत हे शक्य झालं असंही तस्लीमा नसरीन म्हणाल्या. तस्लीमा नसरीन या प्रसिद्ध लेखिका आहेत. 

१९ वर्षांनी त्या कोलकाता या ठिकाणी उपस्थित होत्या. २००७ मध्ये त्यांना कोलकाता सोडावं लागलं. कारण फुटीरतावाद्यांनी त्यांच्या बंगालमध्ये असण्याबाबत आक्षेप घेतला होता. तस्लीमा नसरीन यांच्या विरोधात मोर्चे निघाले होते. डाव्याचं सरकार तेव्हा बंगालमध्ये होतं. या सरकारने तस्लीमा नसरीन यांची हकालपट्टी केली होती. २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आलं, पण त्या बंगालमधे परतू शकल्या नव्हत्या.आता भाजपाच्या कार्यकाळात त्या कोलकाता या ठिकाणी आल्या. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.