🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत स्वकुळ साळी समाज सेवा मंडळातर्फे वेदमुर्ती भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात होणार साजरा​

सांगलीत स्वकुळ साळी समाज सेवा मंडळातर्फे वेदमुर्ती भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात होणार साजरा


सांगली :- येथील स्वकुळ साळी समाज सेवा मंडळाच्या वतीने आद्य दैवत वेदमुर्ती भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी हा जन्मोत्सव श्रावण शुद्ध १३, म्हणजेच मंगळवार दि. २५ ऑगस्ट आणि रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ या दोन टप्प्यांत विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे.

​जन्मोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:२० ते ८:०० या वेळेत पुणे येथील नवविवाहित दांपत्य सौ. व श्री. अर्जुन मांडवकर यांच्या हस्ते श्रींची पूजा व जन्मोत्सव सोहळा पार पडेल. याप्रसंगी आरती, पाळणा, पंचामृत, सुंठवडा वाटप, पोथीवाचन आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून दि. २३ व २४ ऑगस्ट रोजी सर्वांसाठी विनामूल्य खुला रांगोळी स्पर्धा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

उत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजल्यापासून विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:

​सायंकाळी ५:३० ते ७:००: वक्तृत्व स्पर्धा व बालगोपाळांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम.

​सायंकाळी ७:०० ते ८:००: गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा.

​रात्री ८:०० ते ९:००: महाप्रसादाचे आयोजन.

​या कार्यक्रमास कुंडल येथील कृषीभूषण श्री. सुखदेवराव कनोजे आणि इचलकरंजी येथील अग्रगण्य समाजसेवक श्री. महादेवराव साळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ​सदर कार्यक्रमास सांगली शहर व परिसरातील सर्व स्वकुळ साळी समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा. दिनकर डहाके, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कनोजे, सचिव श्री. जगन्नाथ केवले, खजिनदार श्री. अवधूत ठोके यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.