🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयकुमार गोरेंबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल

जयकुमार गोरेंबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल


ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिस ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. या पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपकेंसोबत त्यांचा संवाद सुरू होता.
दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थी आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यानंतर त्यांची विचारपूस आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत जंतर मंतर मैदानावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी अभिजीत दीपकेंच्या पाठीशी उभे राहून भाजपला विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अणि तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली होती. 
दरम्यान, माध्यमांशी बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना ठाकरेंची शिवसेना आगामी निवडणुका अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वाखाली लढवेल, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी गोरे यांच्याबद्दल येXXX असा अपशब्द वापरला होता.
खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत अपशब्द उच्चारून त्यांची बदनामी केली आहे, असा फिर्याद भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून खासदार राऊत यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.