🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'भाची असली तरी नातं घरी, मैदानात गाठ माझ्याशीच!' बंटी पाटलांनी दंड थोपटले; मविआचा विजय खेचून आणण्याचा एल्गार

​'भाची असली तरी नातं घरी, मैदानात गाठ माझ्याशीच!' बंटी पाटलांनी दंड थोपटले; मविआचा विजय खेचून आणण्याचा एल्गार


राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूकांच्या निमित्ताने राजकीय धुरळा उडाला आहे. रविवारी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्याने आता निवडणूकांना रंगत आली आहे.

महायुतीत पुण्याच्या दोन्ही जागा भाजपाला सुटल्या आहेत. मात्र, आता येथे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने आता येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनाला सामारे जाणाऱ्या काँग्रेसचे नेते बंटी उर्फ सतेज पाटील यांनी स्वत:च्या भाचीच्या विरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 
भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांच्या पक्षाने हर्षदा देशमुख-जाधव यांना संधी देण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही उमेदवारात टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले असतानात दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने पदवीधर मतदार संघातून मंगेश चिवटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे मंगेश चिवटे यांनी माघार न घेतल्यास येथे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. 
आज एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनास समोरे जाणाऱ्या काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी MPSC मध्ये झालेला घोळ मुख्यमंत्र्यांना देखील मान्य झाला आहे. येथे तुम्ही क्रेडिट वॉर करू नका. विद्यार्थी कुठला पक्ष म्हणून येथे आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. म्हणजे त्यांना देखील मान्य आहे की घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करा सगळे तथ्य समोर येईल असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

भाची विरोधात दंड थोपटणार
भाजपाने येथे सतेज पाटील यांची भाची स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे त्याचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले की घर फोडणे हा भाजपचा अजेंडा आहे. मात्र याचा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. काँग्रेसने आजगावकर यांना उमेदवारी दिली आहे तर पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी मी काम करणार असे सतेज पाटील यांनी येथे सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.