🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्रीचा पुन्हा हल्लाबोल! जुने हिशोब काढत केलं अत्यंत वादग्रस्त विधान

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्रीचा पुन्हा हल्लाबोल! जुने हिशोब काढत केलं अत्यंत वादग्रस्त विधान


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र, अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नाना पाटेकर यांच्याशी संबंधित जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

तनुश्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर दिसत असून, लखनौला एका कार्यक्रमासाठी जात असल्याचे तिने सांगितले. याचदरम्यान तिने नाना पाटेकर यांच्या निधनाबाबतही प्रतिक्रिया दिली. मात्र, तिने आपल्या वक्तव्यात नानांचे नाव थेट घेतले नाही.

तनुश्रीने सांगितले की, तिला बातमी समजली आहे. मात्र, त्याच दिवशी लखनौमध्ये तिचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने तिला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तिने दिवसाचे आधीच नियोजन केले होते आणि सोशल मीडिया कंटेंटसह इतर कामे करण्याचे ठरवले होते. 
मीडियामध्ये या घटनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता असल्याचेही तनुश्रीने म्हटले. त्यामुळे या विषयावर नेमकी काय भूमिका घ्यायची किंवा प्रतिक्रिया द्यायची, याचा विचार करून बोलणार असल्याचे तिने स्पष्ट केले. त्याचवेळी संबंधित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचेही तिने सांगितले.

दरम्यान, तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. 2018 मध्ये तनुश्रीने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या आरोपांनंतर मोठी चर्चा झाली होती.
तनुश्रीने या प्रकरणी संबंधित कलाकार संघटना आणि पोलिसांकडे तक्रारही केली होती. नाना पाटेकर यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप नाकारले होते. नंतर पुरेशा पुराव्याअभावी हे प्रकरण बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.