🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी: लाचखोर आयुक्तांच्या मुसक्या आवळल्या! ३ अधिकाऱ्यांना बेड्या, राजकारणात अन् प्रशासनात प्रचंड खळबळ

मोठी बातमी: लाचखोर आयुक्तांच्या मुसक्या आवळल्या! ३ अधिकाऱ्यांना बेड्या, राजकारणात अन् प्रशासनात प्रचंड खळबळ


मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. कंत्राटदाराची दोन वेगवेगळ्या कामांची तब्बल 20 लाख रुपयांची बिले मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.




या कारवाईमुळे मालेगाव महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवत काढण्याचे काम आणि जलवाहिनी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे विभागाने कारवाई केली. या प्रकरणात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर या तिघांना अटक करण्यात आली आहे.



कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक झाल्याने मालेगावच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणात महापालिका आयुक्तांसाह तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव हे 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधीच अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.