🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीला धक्का! पोलीस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने पालघर हादरलं; पत्नीवरच संशयाची सुई?

खाकीला धक्का! पोलीस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने पालघर हादरलं; पत्नीवरच संशयाची सुई?

पालघरमध्ये पोलीस दलालाच हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष झिंजुर्डे यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, कौटुंबिक वादातून पत्नी मानसिक छळ करत असल्याचा आरोप संतोष यांनी यापूर्वीच केला होता. जुलै महिन्यात त्यांनी पत्नीविरोधात पालघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता.

मात्र, या तक्रारीवर नेमकी काय कारवाई झाली,असा सवाल आता त्यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे. पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी संतोष झिंजुर्डे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. संतोष झिंजुर्डे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर त्यांची पत्नी रोहिणी पालवे झिंजुर्डे या पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना अपत्यही आहे. मात्र, लग्नानंतर काही काळातच कौटुंबिक कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तर संतोष यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांना फासावर लटकवून मारण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा आणि तपास प्रक्रियेबाबतही कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, संतोष झिंजुर्डे यांच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची पालघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.