सांगली :- फराळाशिवाय कोणत्याही सणाचा आनंद अपूर्णच राहतो. ऐन सणासुदीच्या काळात कुरकुरीत चिवडा, चमचमीत चकली आणि जिभेवर विरघळणाऱ्या लाडूंचा आस्वाद घ्यायचा असेल, तर सांगलीकरांसाठी 'रघुवीर स्वीट्स अँड नमकीन' हे एकमेव हक्काचे ठिकाण ठरत आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासू ब्रँड म्हणून रघुवीर स्वीट्सने ग्राहकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
उत्कृष्ट चव आणि दर्जेदार उत्पादनांची परंपरा
रघुवीर स्वीट्स त्यांच्या अत्यंत नावाजलेल्या मिठाई, नमकीन आणि फ्रेश बेकरी उत्पादनांसाठी ओळखले जाते. खवय्यांच्या पसंतीस उतरणारा गरमागरम ढोकळा, साजूक तुपातील रसरशीत जिलेबी, कुरकुरीत पापडी, यासोबतच दहीवडा, दहीचाट आणि आलुचाट यांसारख्या तोंडाला पाणी आणणाऱ्या चाट आयटम्ससाठी खवय्यांनी येथे आवर्जून भेट दिलीच पाहिजे. तसेच वाढदिवस आणि विशेष प्रसंगांसाठी लागणारे चविष्ट केक्सही येथे उपलब्ध आहेत.
राम मंदिर आणि गेस्ट हाऊस समोर २ भव्य आऊटलेट्स
ग्राहकांच्या सोयीसाठी रघुवीर स्वीट्स अँड नमकीनची सांगलीत राम मंदिर परिसर आणि गेस्ट हाऊस समोर अशी दोन प्रमुख आऊटलेट्स आहेत. दर्जेदार गुणवत्ता आणि अप्रतिम चवीमुळे या दोन्ही आऊटलेट्सवर नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दिवाळीसाठी आकर्षक गिफ्ट पॅक्स आणि बल्क ऑर्डर सुविधा
या दिवाळीत सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रघुवीर स्वीट्सने विशेष फराळ आणि मिठायांचे आकर्षक 'गिफ्ट पॅक्स' बाजारात आणले आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींना, कर्मचाऱ्यांना किंवा व्यावसायिक भागीदारांना दिवाळीची भेट देण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गिफ्ट पॅक्स उपलब्ध आहेत.दिवाळीचा सण आनंदात आणि चविष्ट फराळासोबत साजरा करण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा किंवा रघुवीर स्वीट्सच्या जवळच्या आऊटलेटला भेट द्या, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.