🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

५५० भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्... लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं!

५५० भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्... लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं!


कल्पना करा, नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये काम करत आहात आणि लंचनंतर अचानक नोकरीच गेल्याचं समजतं. एका कंपनीत असंच काहीस झालं आहे. 550 भारतीय कर्मचारी लंच ब्रेकला गेली आणि डेक्सवर परतल्यावर त्यांची नोकरी गेली होती.
26 ऑक्टोबर 2026 रोजी अमेरिकास्थित AI सेवा कंपनी Innodata ने भारतातील जवळपास 550 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॅपटॉपमधून लॉगआउट करण्यात आलं, कर्मचारी आयडी बंद झाले आणि कंपनीच्या सिस्टीमचा प्रवेश अचानक रोखण्यात आला.
काही कर्मचाऱ्यांनी दावा केला की, कामाच्या अकाउंटचा ॲक्सेस बंद झाल्यानंतरच त्यांची नोकरी गेल्याचा मेल पसर्नल इमेल आयडीवर आला. कंपनीने कथितरीत्या व्यावसायिक गरजा कमी झाल्याचे कारण दिले आणि ही कपात वैयक्तिक कामगिरीशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.