🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नॉर्वेच्या पत्रकाराचा व्हिसा रद्द केल्याने वाद; रेवंत रेड्डींनी उपस्थित केले केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नॉर्वेच्या पत्रकाराचा व्हिसा रद्द केल्याने वाद; रेवंत रेड्डींनी उपस्थित केले केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


नॉर्वेच्या पत्रकाराचा व्हिसा रद्द केल्याच्या मुद्द्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पत्रकारांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. केवळ प्रश्न विचारल्यामुळे एखाद्या पत्रकाराला भारतात येण्यापासून रोखणे योग्य नाही, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.




नॉर्वेच्या हेले लिंग या पत्रकाराला हैदराबादमध्ये होणाऱ्या ‘भारत समिट’ या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या माध्यमांचे स्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या भविष्यावर बोलणार होत्या. मात्र, भारतात येण्यासाठी निघण्याच्या काही वेळ आधीच त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला.


हेले यांना भारतात कार्यक्रमासाठी येण्यासाठी आवश्यक परवानगीही मिळाली होती. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ पातळीवरील आदेशानंतर व्हिसा रद्द करण्यात आल्याचे हेले लिंग यांचे म्हणणे आहे. या घटनेवर बोलताना रेवंत रेड्डी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. 



पंतप्रधानांना प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. पत्रकारांचे कामच प्रश्न विचारणे आहे. पंतप्रधानांनी उत्तर द्यायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला देशात येण्यापासून रोखणे हे लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असे रेड्डी म्हणाले. तसेच मोदी यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

आपल्याला जे माहिती आहे किंवा आपण जे सांगतो तेच योग्य आहे, अशी त्यांची भूमिका असल्याचा आरोपही रेवंत रेड्डी यांनी केला. अशी हुकूमशाही मानसिकता लोकशाही देशात असू शकत नाही, असे ते म्हणाले.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.