लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'मतदार फेरतपासणी प्रक्रियेत (एसआयआर) देशातील 14 कोटी मतदार अवैध ठरले असतील तर 2024 ची निवडणूक वैध कशी, असा थेट सवाल त्यांनी केला. तेलंगणा सरकारने आयोजित केलेल्या 'भारत समिट'मध्ये ते बोलत होते. 'भारतील लोकशाही टिकून राहणे हे जागतिक लोकशाही चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे;
मात्र भारतात आता लोकशाही राहिलेलीच नाही हे वास्तव आहे,' असे राहुल गांधी म्हणाले. भारतात 2014 च्या निवडणुकीत प्रचंड पैसा ओतला गेला. या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना मोठा धक्का बसला होता, असेही राहुल म्हणाले. ब्राझीलमध्ये लुला डीसिल्वा यांचा झालेला विजय आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांचा दाखला देत राहुल गांधी म्हणाले, 'भारतातील जनताही धर्मांध शक्तींना अशाच प्रकारे उखडून फेकेल.'
विदेशी प्रतिनिधींची मागितली माफी
'भारत समिट'साठी मोदी सरकारने व्हिसा नाकारलेल्या विदेशी प्रतिनिधींची राहुल यांनी माफी मागितली. 'आमची चूक नसतानाही मी माफी मागत आहे. आमच्या देशात आम्हाला कशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे याची कल्पना तुम्हाला यावरून येईल,' असे राहुल गांधी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.