Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या भोबे गटारीतुन निघाला 10 टन प्लस्टिक कचरा

सांगलीच्या भोबे गटारीतुन निघाला 10 टन प्लस्टिक कचरा 


सांगली: सांगलीच्या 100 फुटी रोडवरील भोबे गटारीची स्वच्छता महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 10 टन प्लस्टिक व अन्य कचरा बाहेर काढण्यात आला आहे. दिवसभरात 70 टक्के भोबे गटारीची स्वच्छता करण्यात आली असून  : अजूनही 5 टन कचरा निघण्याची शक्यता आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून भोबे गटारीची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

सांगली येथील भोबे गटरामध्ये कचरा आणि अन्य प्लास्टिक साहित्य साचून राहिल्याने सदर गटार प्रवाहित होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार जेसीबीच्या सहाय्याने भोबे गटार स्वच्छ करण्याचे काम चालु करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात साधारण ७०% काम पुर्ण करून १० टना पर्यंत प्लास्टिक व गाळ कचरा काढण्यात आला असून अजूनही ५ टनापर्यंत प्लास्टिक कचरा निघण्याची शक्यता आहे. संपूर्ण भोबे गटार स्वच्छतेचे काम मंगळवारपर्यंत पुर्ण होईल. या भोबे गटारीमधून प्लास्टिक कचरा व इतर कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला असल्याने नागरिकांनी गटारीमध्ये कचरा टाकु नये असे आवाहन महानगर पालिकेकडून नागरीकांना करण्यात येत आहे. सदर कारवाई उपायुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वै. आरोग्याधिकारी रविंद्र ताटे, वरीष्ट स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, गणेश माळी यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्याकडून केली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.