राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून परिवर्तन प्रतिष्ठान कराड जि सातारा (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सांगली च्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांना राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श समाज सेविका हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी या संस्थेचे अध्यक्ष समाज भुषण आप्पासाहेब गायकवाड म्हणाले की ज्योती ताईंना हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे त्यांनी अगदी लहानपणापासून प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे त्यांचे वडील मिल कामगार होते एके दिवशी कामावरून घरी परतत असताना रेल्वेत चढताना हात निसटला आणि दोन्ही पाय गमवावे लागले त्यात त्यांची बहीण ही जन्मतः पोलीओग्रस्त अपंग.राहायला घर नाही पुर्णतः बेघर अशा प्रसंगी त्यांच्या माऊलीने दोन लहान मुली त्यात एक मुलगी अपंग.नवरा पुर्णपणे अपंग राहायला घर नाही कोणीतरी सुचविले म्हणून झोपडपट्टीचा रस्ता धरला तिथे एका उकीरड्यावर झोपड मारु लागल्या त्याच क्षणी आजुबाजुच्या लोकांनी विरोध केला आणि म्हणाले" तुम्ही येथे झोपडी घालु शकत नाही आम्ही कचरा कुठे टाकायचं "अशावेळी त्या माऊलीने गयावया करुन कसतरी झोपड उभं केलं आणि बरोबर १० वर्षांनी १९९६ सांली या बी ए च्या पहिल्या वर्षात असतानाच एक कॉलेज ला जाणारी मुलगी नगरपरिषद ची निवडणूक लागली आणि निवडून आली आणि आपल्या ज्योती ताई ज्या भागात नाकारले त्याच भागाच्या लोक प्रतिनिधी झाल्या असा त्यांच्या आयुष्यात आलेला टर्निंग पॉइंट घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणे कठीण झाले त्यामुळे त्यांना वसईतील आश्रमचा रस्ता धरावा लागला ऐन तारुण्यात काही वर्षे एखाद्या अनाथ मुलीसारखे आयुष्य कंठावे लागले आश्रमात आज्यांची सेवा करीत न्यु इंग्लिश स्कूल वसई येथे स्वतः चे शिक्षण पुर्ण केले.
त्यांना आश्रमात राहुन खुपचं कटु अनुभव आले एखादी आज्जी गेली तर अंतिम संस्कार करायला मुलं यायची नाहीत ते सर्व सोपस्कार त्या स्वतः आणखी तेथील महिला मिळुन पार पाडायचे अगदी चिता रचण्यापासुन अस्थी विसर्जनापर्यंत.त्याचे वडील अपघाता नंतर ३० वर्षे अंधरुणावर खिळुन होते इतके वर्ष घरातील सर्वांनी लहान मुलासारखे सांभाळ केला आणी१० वर्षांपुर्वी त्यां चे निधन झाले त्यांवेळी त्यांनी स्वतः पुढे होऊन नेत्रदान करुन घेतले पै पाहुण्यांचा विरोध पत्करून आपल्या वडीलांना अग्नी दिला अशा या करारी जिद्दी आणि धाडसी ज्योती ताई च्या बाबतीत शुन्यातुन विश्व निर्माण केलंय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्यांनी त्यांचे लहानपण अतिशय दारिद्रय अवस्थेत घालविले आहे कोणतीही सामाजिक राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रभागात निवडून येऊन हॅट्रीक केली आहे या दरम्यान त्या प्रभाग समितीच्या सभापती व स्थायी समिती सदस्या म्हणून आपली जोरदार कामगिरी पार पाडली सभापती म्हणून त्यांनी उल्लेख निय काम करून दाखवले. राजकारणात राहुन समाज कारण कसे करता येते हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवुन दिले महापुरुषांच्या नावाचा नुसताच जयघोष न करता त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत असतात आयुष्य जगत असताना इतके वाईट अनुभव आले पण त्यांनी ते कवटाळून न बसता त्यावर मात केली अविवाहित असतानाच त्यांनी एक ६ महिन्यांचं बाळ दत्तक घेतलं आणि त्याला एक चांगला माणूस म्हणून घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याला आई आणि बापाचे प्रेम देऊन घडवित आहेत त्यांनी त्यांच्या मुलांचे नाव जीवन ज्योती आदाटे असेच ठेवले आहे एक सिंगल मदर सुध्दा मुलाला मोठं करू शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीचा व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्वतः नामदार जयंत पाटील यांनी त्यांची संजय गांधी निराधार योजना समिती सांगली या महाराष्ट्र शासनाच्या समितीवर अध्यक्षा म्हणून निवड केली या समितीवर यापुर्वी अध्यक्ष हे आमदारच असायचे अशा या अति महत्त्वाच्या पदावर ज्योती ताईंना संधी दिली आणि या संधीचे त्यांनी सोने केले आहे त्या भागा भागात जाऊन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणे त्यांना प्रस्ताव टाकण्यास प्रोत्साहन देणे त्यांची दलालाकडुन पिळवणूक होऊ नये यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करीत असतात या कोरोणाच्या काळात सुध्दा जिवाची पर्वा न करता हे काम करीत असतात आदी असे कधीच घडले नाही त्यांनी तर सांगलीच्या इतिहासात घडले नाही असे काम करून दाखवले आहे ते म्हणजे अतिदुर्लक्षित वंचित असलेल्या वारांगना घ्या दारात समीतीला नेऊन आपल्या कामाचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहे.
त्या आकार फौंडेशनच्या ट्रस्टी देखील ज्या संस्थेत एकपालकत्व व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी झटणारी संस्था आहे त्या संस्थेत सक्रीय सहभाग असतोच याउपर या संस्थेतील एका मुलीला शैक्षणिक प्रायोजक अंतर्गत दत्तक घेतले आहे जेणेकरून त्या मुलीला उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायचा ध्यास घेतला आहे त्यांच्या या राजकारण समाजकारणा बरोबर सांस्कृतिक क्षेत्रात ही आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत च तसेच अखिल भारतीय नाट्य व चित्रपट महामंडळावर आजीव सभासद देखिल आहेत अनेक नाटकांतून आणि चित्रपटातुन भुमिका ही केलेल्या आहेत अनेक दिग्गज कलाकारासोबत त्यांनी काम केले आहे अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्योती ताईंना राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले आदर्श समाज सेविका हा पुरस्कार देताना अभिमान वाटत आहे विषेश म्हणजे आजच त्यांच्या मुलाचा जीवन याचा २१ वा वाढदिवस त्याला सर्वाच्या वतीने अभिष्टचिंतन करतोय अस म्हणाले हा पुरस्कार स्विकारताना त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा जीवन आणि त्यांच्या सहकारी प्रियांका तुपलोंडे होत्या या पुरस्कार सोहळ्यास सातारा जिल्ह्यातील रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड नायब तहसीलदार तांबे बी एम गायकवाड ग्राहक संरक्षण कक्षाचे राजेंद्र माने प्रेस कौन्सिल महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष दिलीप सवणे मानवाॶधिकारच्या प्रिया अधिकारी या नारोत्तम चव्हाण डॉ विजय निलावर बुध्दभुषण गायकवाड प्रमोद काशिद सुजाता वर्षे शंकर वीर सतीश कांबळे आनंद सव्वाखंडे आणि माधुरी टोणपे इ मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.