कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'हे' सरकार देतेय 3 लाखांपर्यंत सबसिडी
05 डिसेंबर 2021 :- सध्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्याकडे आणि वापरण्याकडे कल वाढला आहे. सरकारही याला प्रोत्साहन देत आहे. तुमचाही जर कार घ्यायचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कार खरेदीसाठी सरकार 3 लाखांचे अनुदान देत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नवीन धोरण सुरू केले आहे. खरं तर, ई-वाहनांच्या (EV) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, गोवा सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन पॉलिसी-2021 लाँच केले.
इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन मिळेल
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या राउंड टेबल दरम्यान हे धोरण सुरू केले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, या धोरणाचा मुख्य उद्देश बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि राज्यातील लोकांना रोजगार निर्मिती करणे हा आहे.
राज्य सरकार अनुदान देईल
मुख्यमंत्री म्हणाले, आमचे धोरण दोन, तीन आणि चारचाकी ई-वाहनांसाठी आहे. दुचाकी वाहनांसाठी 30 टक्के आणि तीन चाकी वाहनांसाठी 40 टक्के आहे. चारचाकी वाहनांसाठी आम्ही 3 लाख रुपये देऊ.
'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' हा नियम
'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' तत्त्वावर सुमारे 400 वाहनांना हा लाभ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या धोरणामुळे राज्यात 10,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.