Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला

 ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला


पुणे:
कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.

ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनाच या आजाराचा अधिक धोका असल्याचंही भोंडवे यांनी सांगितलं आहे. तसेच हा आजार न होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याची माहितीही त्यांनी दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे यांनी टीव्ही9 मराठीशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनचा धोका आणि तो रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर भाष्य केलं. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी ओमिक्रॉनचा धोका अधिक आहे. डेल्टा विषाणूपेक्षा ओमिक्रॉन पाचपट वेगाने अधिक पसरतो. त्याचा पसरण्याचा वेग अधिक असला तरी या आजाराची लक्षणे गंभीर नाहीत.

लहान मुलांना सर्वाधिक धोका

यावेळी भोंडवे यांनी लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2 ते 18 या वयोगटातील ज्यांचं लसीकरण झालं नाही. त्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे लस घेणं महत्त्वाचं असून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

काय करावे आणि काय करू नये

ओमिक्रॉन रोखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची माहितीही त्यांनी दिली आहे. हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क वापरणे या गोष्टी केल्याच पाहिजे. तरच ओमिक्रॉनला रोखता येणं शक्य आहे. तसेच गर्दीत जाणं टाळलं पाहिजे आणि लस घेतली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याची सूचनाही भोंडवे यांनी केली आहे.

ऑक्सिजन प्लांट, हॉस्पिटलं तयार ठेवा

ओमिक्रॉन रोखण्यासाठी प्रशासनाने टेस्टिंग वाढवली आहे. परदेशातून येणारे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. ही संख्या अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट आणि हॉस्पिटलं तयार ठेवली पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.