Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुपवाड शहरात महिलांचा हळदी कुंकवाचा भव्य मेळावा पार पडला

कुपवाड शहरात महिलांचा हळदी कुंकवाचा भव्य मेळावा पार पडला


कुपवाड शहरात महिलांचा हळदी कुंकवाचा भव्य मेळावा पार पडला हा मेळावा आगळावेगळा होता कारण हळदी कुंकवाचा मान आणि वाण विधवा घटस्फोटीता परित्यक्ता या महिलांना आवर्जून बोलावुन करण्यात आला नेहमीच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन हा उपक्रम घेण्यात आला महिलांसाठी संगित खुर्ची चा कार्यक्रम ही करण्यात आला विषेश म्हणजे या कार्यक्रमासाठी खास करुन संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले त्यांनी विविध विषयांवर महिलांसमोर भाष्य केले त्या म्हणाल्या की महिलांनी राजकारणापासून अलिप्त राहू नये राजकारणात राहुन समाज कारण करता येते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावरच कळेल.

या पक्षात प्रत्येक महिलांचा सन्मान केला जातो आरोग्यासाठी सातत्याने राबणारा आमचा पक्ष व आमचे सहकारी बघितल्यावर लक्षात येईल कोणत्याही स़ंकटात अग्रेसर राहणारे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आमचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय जी बजाज साहेब आणि राहुल दादा पवार  यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आघाडीवर आहे त्यामुळे च महिलांनी निर्भयपणे राजकारणात यावे आमच्याशी केव्हाही संपर्क साधु शकता  आमच्यासोबत येऊन क्रियाशील कार्यकर्त्या होऊन समाजात आपली ओळख निर्माण करावी.तसेच महिलांनी आपल्यात सामाजिक बांधिलकी ची जाणीव आणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला पाहिजे आपण दैनंदिन जीवनात. 

 आपल्या मुलांसमोर अंधश्रद्धा पसरवित असतो थोडक्यात शिंक आली सत्य आहे,पाल चुकचुकली सत्य आहे, लाईट लागली की नमस्कार ,मांजर आडवे गेले की मागे फिरणे असल्या एक ना अनेक गोष्टी आपल्या मुलांच्या डोक्यात घालतो आणि ही मुलं आपलंच अनुकरण करतात थोडक्यात काय तर आपली पुढची पीढी आपण च खराब करतोय हे आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे तर्क बुध्दीचा वापर करा डोळस बना तसेच त्या पुढे म्हणाल्या की कोणत्याही भोंदू बाबा च्या नादाला लागू नका त्यांनी तुमच्या अक्षिशित अंधश्रद्धा ळु पणाचा गैरफायदा घेण्यासाठी दुकाने थाठुन बसली आहेत या अशा अनेक भोंदू बाबांना आमच्या अंधश्रद्धा निर्मुलन समिती ने पकडुन त्यांचा पर्दाफाश केला आहे जादुटोणा कायद्याच्या अंतर्गत अनेक भोंदू बाबांना शिक्षाही झाली आहे.

हे सर्व काम आम्ही जीवावर उदार होऊन करतोय जेणेकरून तुमच्या सांरख्यांची आर्थिक शारीरिक व मानसिक पिळवणूक होऊ नये यासाठी आणखी एक गोष्ट मनात अगदी घट्ट कोरून ठेवा ती म्हणजे जगात कुठेही दैवी शक्ती किंवा चमत्कार नाही जर काही असेल तर ते फक्त विज्ञान आणि हातचलाखी.समाजात याचे प्रबोधन करण्यासाठी आमची समिती अनेक शाळा काॅलेज शहरातील खेडोपाड्यातील विविध भागात जाऊन प्रबोधन देऊन चमत्काराचे प्रात्यक्षिके सहीत प्रयोग सादर करुन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करीत असते पुढे त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे आणि कागदपत्रे काय लागतात ते सांगितले दलाल कसे फसवितात आपण स्वतः आपले प्रस्ताव कसे करून घ्यायचे यांचे विस्ताराने मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे नियोजन कुपवाड शहर चे अध्यक्ष संजय तोडकर कुपवाड च्या युवती अध्यक्षा रुपाली कारंडे  कार्यकर्ती प्रियांका विचारे तसेच कुपवाड च्या महिला अध्यक्षा वैशाली कळके यांनी केले.या कार्यक्रमासाठी नगरसेविका सविता मोहीते नगरसेवक विष्णु माने आणि शेठजी मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रमुख उपस्थितीत सांगली शहर च्या अध्यक्षा अनिता पांगम मिरजेच्या अध्यक्षा वंदना चंदनशिवे युवती च्या अध्यक्षा अमृता चोपडे दिव्यांग सेलच्या अध्यक्षा आशा पाटील महिला आघाडीच्या उपाध्यक्षा राधिका हारगे आणि जसबीर कौर महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे आणि युवती ची सरचिटणीस प्रणोती हिंगलजे राणी कामटे कालिका पांगम आणि असंख्य महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.