Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात.

 काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात.


कर्नाटकातील कॉलेजमधून सुरू झालेला हिजाब वाद आता देशभऱात पसरू लागला आहे. देशभरातून या वादावर पडसाद उमटले जात आहेत.यातच आता काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

'महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात', असा अजब तर्क जमीर अहमद यांनी लावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. 'हिजाब म्हणजे इस्लाममध्ये पर्दा. महिलेचे सौंदर्य लपविण्यासाठी हा पर्दा असतो. महिला जेव्हा हिजाब घालत नाही तेव्हा त्यांचा बलात्कार होतो. हिजाब महिलांचे सौंदर्य लपवतो. आज भरतात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. कारण महिला आता हिजाबमध्ये राहत नाही', असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

दरम्यान, हिजाब विवादामुळे कर्नाटक सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुट्ट्या 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवल्या आहेत. वाढत्या वादामुळे राज्य सरकारने 9 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं बंद करण्याचे आदेश दिले होते आणि ही मुदत 14 फेब्रुवारीपर्यंत होती. या शिवाय सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत पदवी आणि डिप्लोमा महाविद्यालयांनाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हा बंदचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे.

वर्गात नमाज पढतानाचा व्हिडीओ व्हायरल

कर्नाटक येथील शाळांमध्ये मुस्लीम शाळांमध्ये मुलींच्या हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू आहेत. या वादात आता अजून भर पडली आहे. एका शाळेतील वर्गात काही विद्यार्थी नमाज पढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतला असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ 4 फेब्रुवारीचा आहे जो आता व्हायरल होत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.