Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ध्वनीची विहीत मर्यादा राखून विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

ध्वनीची विहीत मर्यादा राखून विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली दि. 16  : सण, उत्सव, समारंभासाठी ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याकामी राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी एकूण 9 सण / उत्सवासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत दिली आहे.

ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत देण्यात आलेले सण / उत्सव पुढीलप्रमाणे - शिवजयंती (शासकीय) - 1 दिवस, ईद-ए-मिलाद - 1 दिवस, डॉ. आंबेडकर जयंती - 1 दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन - 1 दिवस, गणपती उत्सव - 5 दिवस (गणेश चतुर्थी, पाचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस, अनंत चतुर्थी), नवरात्री उत्सव - 2 दिवस (अष्टमी व नवमी), दिवाळी - 1 दिवस (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस - 1 दिवस, 31  डिसेंबर - 1 दिवस.

वरीलप्रमाणे देण्यात आलेली सवलत घोषीत शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. घोषीत शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त सांगलीमिरज कुपवाड शहर महानगरपालिका, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्राधिकृत केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.