Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात घरपट्टीचे 844 बडे थकबाकीदार

महापालिका क्षेत्रात घरपट्टीचे 844 बडे थकबाकीदार : घरपट्टीची वसुली 38 कोटीं 39 लाखावर तर थकबाकी मागणी 44 कोटींवर : बड्या थकबाकीदारांची थकबाकी 17 कोटींवर : घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडून 5898 मालमत्ता धारकांना नोटिसा: सोमवारपासून वसुलीसाठी मालमत्ता सील करण्याची मोहीम सुरू होणार: आपले थकीत कर वेळेत भरण्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन



सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका घरपट्टी विभागाच्या एकूण 93 कोटी 97 लाखाच्या उधिष्ठापैकी 38 कोटी 39  लाखाची घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. उर्वरित 44 कोटी 47 लाखाच्या वसुलीसाठी महापालिकेकडून 5898 मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या असून सोमवारपासून थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकीत कर वेळेत भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

    सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या घरपट्टी विभागाची थकबाकी आणि वार्षिक मागणी ही 93 कोटी 97 लाख आहे. यामध्ये एकूण थकबाकी ही 49 कोटी 54 लाख आहे तर 44 कोटी 47 लाख ही वार्षिक मागणी आहे. या एकूण 93 कोटी 97 लाख पैकी 38 कोटी 39 लाख इतकी घरपट्टी जमा झाली आहे. तर थकबाकी मध्ये 844 बड्या थकबाकीदारांची थकबाकी ही 17 कोटींवर आहे. उर्वरित 44 कोटीं 47 लाखाच्या वसुलीसाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने घरपट्टी विभागाने 5898 इतक्या मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.  तर सोमवारपसून महापालिकेकडून थकीत घरपट्टी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत घरपट्टी भरून सहकार्य करावे असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यानी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.