महापालिकेकडून मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण : 1 लाख 59 हजार 519 मालमत्तांचा सर्व्हे : 19437 मालमत्ताना घरपट्टी लागू नाही ; आज आयुक्तांना अहवाल सादर होणार : घरपट्टी अधीक्षक उज्वला शिंदे यांची माहिती
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या आदेशानुसार घरपट्टी विभागाने मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये एकूण 19437 इतक्या मालमत्ताना घरपट्टी लागू नसल्याचे समोर आले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मंगळवारी आयुक्त नितीन कापडणीस यांचेकडे सादर केला जाणार असल्याची माहिती घरपट्टी अधीक्षक उज्वला शिंदे यांनी दिली.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचा सर्व्हे सुरू करण्यात आला होता. 7 मार्च 2022 रोजी मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. आजअखेर घरपट्टी विभागाने एकूण 1 लाख 59 हजार 519 मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला तर यामध्ये 19437 इतक्या मालमत्ताना घरपट्टी लागू नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक खुले प्लॉट आणि बांधकामे यांचा अधिक समावेश आहे. घरपट्टी लागू नसलेल्या मध्ये सांगलीत 7675 , मिरजेत 7447 आणि कुपवाडमधील 4315 इतक्या मालमत्तांचा समावेश आहे. घरपट्टी विभागाच्या सर्व्हे पूर्ण झाला असून मंगळवारी सर्व्हेचा संपूर्ण अहवाल आयुक्त नितीन कापडणीस यांना सादर केला जाणार असल्याची माहितीही घरपट्टी अधीक्षक उज्वला शिंदे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.