आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत मनपा बांधकाम विभागात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत महापालिका बांधकाम विभागाकडुन कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्या सूचनेनुसार शहर अभियंता संजय देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शहर अभियंता संजय देसाई, नगर अभियंता भगवान पांडव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियंता संजय देसाई, नगर अभियंता भगवान पांडव यांनीही देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, साजिद शेख, पुनम वर्मा, सुशांत कांबळे, विजय कुंभार, समीर जामदार, मुमताज तांबोळी, अभिजित सातपुते, रुचिरा गवळी, मयुरी सगरे, प्रभावती डोंगरे आदींनी देशभक्तीपर गीते सादर करीत कार्यक्रमाला रंगत आणली. यावेळी बाल कलाकार रुद्र सुशांत कांबळे, विशाल डोंगरे यांनीही पोवाडा सादर करीत सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे आयोजन पूनम वर्मा, चेतन मोदी , समीर जामदार आदींनी केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.