Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सिव्हील परिसरातील रस्ते हातगाड्यांच्या विळख्यात

सांगली सिव्हील परिसरातील रस्ते हातगाड्यांच्या विळख्यात


वारंवार वाहतुक कोंडी  वाहतूक पोलिस, महापालिकेचे अक्षम्य दुलर्क्ष

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने नुकतेच सिव्हील हॅस्पिटल चौकाचे सुशोभीकरण केले आहे. शिवाय या चौकाचे रूंदीकरणही करण्यात आले आहे. चौकाचे रूंदीकरण होऊनही सिव्हील हॅस्पिटल परिसरातील रस्त्यांवर हातगाड्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सिव्हील समोरील रस्त्याचेही रूंदीकरण करूनही या परिसरातील रस्ते हातगाड्यांच्या विळख्यात अडकले आहे. या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून याकडे वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे अक्षम्य दुलर्क्ष होत आहे. 


सांगली सिव्हील चौकाचे नुकतेच रूंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. शिवाय सिव्हील समोरील रस्त्याचे रूंदीकरणही करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवस या रस्त्यावरील अतिक्रमण आणि हातगाड्यांवर कारवाईचे नाटक केले. त्यानंतर मात्र लगेचच पुन्हा या परिसरातील रस्ते हातगाड्यांच्या विळख्यात अडकले आहेत. शिवाय सिव्हील हॅस्पिटलमध्ये येणाऱ्या रूग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची गदीर् होत असल्याने या परिसरात वाहनांचे अस्ताव्यस्त पाकिर्ग केले जात आहे. 


याबाबत परिसरातील व्यावसायिकांनी वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीही येथील हातगाडे आणि रस्त्यावर पाकिर्ग केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाईच होत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने दुचाकी आणि चारचाकीची क्रेन या परिसरात दिवसातून दोनवेळा जरी फिरवली तर वाहतूक शाखेला महामागार्वर थांबून वसूली करावी लागणार नाही अशीही चचार् आता होऊ लागली आहे. सांगली सिव्हील परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी हातगाडे आणि वाहनांवर कारवाई गरजेची आहे. शिवाय या परिसरात अन्य हॅस्पिटलही असल्याने येथे रूग्णवाहिकांची वारंवार ये-जा असते. त्या रूग्णवाहिकांनाही या अतिक्रमण आणि रस्त्यावरील पाकिर्गचा त्रास होत आहे. वाहतूक शाखा आणि महापालिका एखाद्या रूग्णाचा जीव गेल्यानंतर जागी होणार का असा प्रश्न परिसरातील व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.