Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण..

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण..


जत : सांगली जिल्ह्यात चार साधूंना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लहान मुलांना चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चारही साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातील एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून पंढरपूर मार्गे निघाले. मात्र, त्तपूर्वी त्यांनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केली.


साधू आणि ग्रामस्थांमध्ये सुरुवातील शाब्दिक चकमक झाली त्यांनतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या साधूंच्या आधार कार्डची तपासणी केली. या साधूंकडे मिळालेले आधार कार्ड आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं. संपूर्ण चौकशीनंतर साधूंची सुटका करण्यात आली. हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी साधूंनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.