मार्जिन मनी योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 16, : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. 6 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता इच्छुक धनगर समाजातील नवउद्योजक महिला लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नमूद सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन मार्जिन मनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालय सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2374739 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.