Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कार खेळाडुंनी पुरस्कारांकरिता नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत

खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कार खेळाडुंनी पुरस्कारांकरिता नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत

सांगली, दि. 16,  : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या नामांकनाकरिता नामनिर्देशन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करावेत.  विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज तसेच अपुर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. 

या वर्षीपासून पात्र खेळाडुंनी या पुरस्काराकरिता मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. हे अर्ज भरताना कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तींची शिफारस न घेता ते केंद्र शासनाच्या https://dbtyas-sports.gov.in/ या संकेतस्थळावर थेट सादर करावे. अर्ज संदर्भात नियमावली तसेच विहित नमुन्यातील अर्ज https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास Department of sports At section.sp4-moyas@gov.in या ई-मेल किंवा 011-23387432 या क्रमांकावर कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.