Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात आदर्श अटल आवास योजना

सांगली जिल्ह्यात आदर्श अटल आवास योजना 


राबवण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे सर्वेक्षण सुरू - सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव सर्व नोंदीत बांधकाम कामगारांनी सुविधाकाराशी संपर्क साधून सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे


सांगली, दि. 14,  : कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या ‍निर्देशानुसार कामगार विभागाकडून सहाय्यक कामगार आयुक्त सांगली कार्यालयामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई कडे नोंदणीकृत सुमारे 65 हजार बांधकाम कामगारांचा सर्व्हे करून सांगली जिल्ह्यात आदर्श अटल आवास योजना प्रकल्प राबविण्याचा विचाराधीन आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात आदर्श अटल आवास योजना राबवण्यासाठी 65 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक सर्वेक्षणाकरीता दि. 13 सप्टेंबर 2022 पासून नियुक्त केले आहे. हे पथक आठ दिवसामध्ये सर्वेक्षण पूर्ण करणार आहे. सर्व नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या सुविधाकाराशी संपर्क साधून सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.

तालुकानिहाय नियुक्त केलेल्या सुविधाकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ‍मिरज - सुरेश लोहार (मो.नं. 9960480030), सांगली - चंद्रकांत साळुंखे (मो.नं. 9850847357), कवठेमहांकाळ - सुकुमार कोळी (9226845718), आटपाडी - श्री. लांडे (मो.नं. 9921971163), कडेगाव - महेश हेंद्रे (मो.नं. 9860512151), पलूस - राजेश सलगर (मो.नं. 8390115678), वाळवा - विजय फडतरे (मो.नं. 9890947570), शिराळा - गोरखनाथ थोरवत (मो.नं. 9420931718), खानापूर - श्री. सुर्यवंशी (मो.नं. 9881811542), तासगाव - श्रीकांत मर्तनवार (मो.नं. 9850559175), जत - रामकृष्ण राऊत (मो.नं. 7498322944).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.