शेतात जाणार्या 4 शेतकर्यांना एका अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू
खानापूर : गोधोळी गावाच्या शेतात जाणाऱ्या चार शेतकऱ्यांना अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं 2 शेतकरी जागीच ठार, तर एकाचा केएलईत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली
गोधोळीचे 4 शेतकरी त्यांच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी जात होते. गावाच्या शिवारात पायी चालत शेताकडं जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी एकाचा बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर दुसरा किरकोळ जखमी झाला.
महाबळेश्वर शिंदे (वय 65), गोधोली गावातील पुंडलीक रेडेकर (वय 72) आणि पुंडलिकचा मोठा भाऊ कृष्णा रेडेकर (74) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. अन्य जखमी मंजुनाथ कागीनाक (47) यांना किरकोळ दुखापत झाल्याने ते बचावले. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.