सांगलीतीच डायपोर्ट होणार; संजय काका पाटील
सांगली: जिल्ह्यातील रांजणी व सलगरे या ठिकाणी डायपोर्टचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदारांनी मागणी केल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाहणी केली. पण तेथील जागा व्यवहार्य नाही. त्यामुळे सांगलीचे डायपोर्ट कुठेही जाणार नाही, असा दावा खासदार संजय पाटील यांनी पत्राकांशी बोलताना केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील मजले व जांभळी येथे डायपोर्ट करण्याबाबत उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यामुळे सांगलीचे डायपोर्ट मागे पडल्याची चर्चा रंगली होती. याबाबत खासदार पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील खासदारांनी मागणी केल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जागेची पाहणीसाठी अधिकारी पाठविले होते. पण या जागा डायपोर्टसाठी व्यवहार्य नाहीत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातच डायपोर्ट होईल.रांजणी येथील डायपोर्टचा प्रस्ताव आहे. पण गेल्या अडीच वर्षात उद्योग विभागाने अतिरिक्त जमीन दिली नाही. त्यामुळे डायपोर्टचा विषय रेंगाळला. सलगरे येथे डायपोर्टसाठी गायरानाची ४०० ते ५०० एकर जागा आहे. शिवाय ग्रीन महामार्गही सलगरेजवळून जातो. त्यामुळे या दोन्ही जागेपैकी एका ठिकाणी डायपोर्ट होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.