Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुपवाडमध्ये खून : दोघेजण ताब्यात

कुपवाडमध्ये खून : दोघेजण ताब्यात


सांगली :  कुपवाड-बामणोली रस्त्यावरील कमानीजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी त्याच्याच नातेवाईक असलेल्या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यातुन दोघांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जमिनीच्या पैशाच्या वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कुपवाड परिसरातील विजय जाधव, सागर जाधव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. अमर ऊर्फ गुट्ट्या जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. अमरवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे 2 गुन्हेही दाखल आहेत. त्याचा त्याच्या नातेवाईक तसेच काही मित्रांशी जमिनीवरून वाद सुरू होता. हद्दपार असतानाही अमर कुपवाडमध्ये आला होता.

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो बामणोली कमानीजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित तेथे आले. त्यांच्यात जमिनीबाबतच्या पैशांवरून वाद झाला. नंतर संशयितांनी त्याच्यावर कोयत्यांनी वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. त्यांनी हल्ल्यात वापरलेले कोयते घटनास्थळी पडले होते.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. या हल्ल्यातील मारेकरी मृत अमरचे नातेवाईक असल्याचे पोलिसांना खबऱयाद्वारे कळाले होते. त्यानुसार कुपवाड पोलिस तसेच एलसीबीचे पथक संशयितांच्या मागावर होते. एलसीबीचे पथक सोलापूर, कर्नाटक परिसरात गेले होते. कुपवाड पोलिसांना ते कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे असल्याची माहिती मिळाली. कुपवाड पोलिसांनी तेथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.