महापालिकेकडून प्रलंबित गुंठेवारी प्रस्ताव नियमितिकरण शिबिरास सुरुवात
महापालिकेकडून प्रलंबित गुंठेवारी प्रस्ताव नियमितिकरण शिबिरास सुरुवात ; पहिल्या दिवशी. 96 प्रलंबित प्रस्तावाचे अर्ज दाखल : बुधवार पर्यंत चालणार शिबिर
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून महापालिकेकडे दाखल प्रलंबित गुंठेवारी प्रस्ताव नियमितकरण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार सोमवारपासून प्रलंबित गुंठेवारी प्रस्ताव नियमितिकरण शिबिरास सुरुवात झाली. यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही ठिकाणहुन 96 प्रलंबित प्रस्तावाचे अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार 19 एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणार आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहरात गुंठेवारी नियमितकरणासाठी अनेक प्रस्ताव दाखल आहेत. या दाखल गुंठेवारी प्रस्तावाचे नियमितीकरन करण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांनी विशेष शिबिर घेणेचे आदेश प्रशासनाला दिले होते. या आदेशानुसार उपआयुक्त राहुल रोकडे आणि उपआयुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार सोमवार दिनांक 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत दाखल गुंठेवारी प्रस्तावाचे नियमितीकरन करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी सांगलीतून 52 मिरज 19 आणि कुपवाडमध्ये 25 असे एकूण 96 प्रलंबित प्रस्ताव गुंठेवारी नियमितकरणासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून यामध्ये फक्त जुने आणि महापालिकेकडे प्रलंबित असणारे गुंठेवारी प्रस्तावाचे अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहायक संचालक नगर रचना विनय झगडे, नगर रचनाकार कुपवाड आणि मिरज आर.व्ही. काकडे , नगररचनाकार सांगली वैभव वाघमारे आणि प्रतीक डोळे, अभियंता अण्णासाहेब मगदूम, रवी भिंगारदिवे, आझम जमादार, ए एच मोरे, यासीन मंगळवारे, शाबाज शेख, वरिष्ठ लिपिक काशिनाथ पाटील, चेतन हडदरे, सचिन पाटील, श्रीपाल आवटी, विजय कदम, प्रसन्न भोसले , महादेव पाटील, रेकॉर्ड किपर भालचंद्र कांबळे, नासीर जांभळीकर यांनी सहभाग घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.