महापालिका राबवित आहे पर्यावरण पूरक योजना : आयुक्त सुनील पवार यांच्या नियोजनामुळे महापालिका क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना प्रगतीपथावर
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महापालिका क्षेत्रात अनेक पर्यावरण पूरक योजना राबवित आहेत. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या नियोजनामुळे महापालिका क्षेत्रात शासनाच्या अनेक महत्वकांक्षी योजना प्रगतीपथावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लवकरच सांगली मिरज आणि कुपवाड वासियांना अनेक विकासात्मक कामे पाहायला मिळणार आहेत. यामध्ये माझी वसुंधरा या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत आणि सहभागातून मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक योजना राबविल्या जात आहेत. यासह आमराई व काळीखण सुशोभिकरणाचे सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. जनतेची गरज लक्षात घेवून सांगलीतील नेमिनाथनगर येथे महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर चिल्ड्रन पार्क विकसित करण्यात आले आहे. याचा दररोज शेकडो लहान मुलांना व व मोठया लोकांना विरंगुळासाठी फायदा होत आहे.
मिरजेतील गणेश तलाव व सांगली येथील काळीखण लोकांसाठी बोटींग सुरु करण्यात येत आहे. कुपवाड वारणाली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर (UCHC) हे हॉस्पिटल जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने लवकरच सुरु करण्यात येत आहे. जनतेच्या सहभागातून विविध ६४ ठिकाणी चौक सुशोभिकरण व मनपाच्या खुल्या जागा विकसित करण्यात येत आहे. नाममात्र शुल्कामध्ये महानगर पालिकेमार्फत आरोग्य विषयक विविध प्रकारच्या चाचण्या करण्याकामी मध्यवर्ती निदान केंद्र उभारण्यात आले आहे. यामधून एका वर्षात ७५००० टेस्ट करण्यात आल्या असून लोकांची अंदाजित रु १.२५ कोटी रुपयाची बचत झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन रु. ७९ कोटी प्रकल्पाचे निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली असून एजन्सी नियुक्त करण्यात आलेली आहे. यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. मिरज भारत नगर काळीखण येथील सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. यामुळे मिरज शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शासनाकडून कुपवाड़ ड्रेनेज योजना कामास मंजुरी देण्यात आली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमुळे कुपवाड शहर तसेच सांगली व मिरजेच्या काही भागांना याचा लाभ होणार आहे. शासनाकडून सांगली शहरास नाटयगृह मंजूर झालेले आहे.
यामुळे नाट्य पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीत एक अत्याधुनिक असे नाट्यगृह लवकरच उभे राहणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांचा समतोल विकास साधत अनेक महत्त्वपूर्ण योजना मार्गी लागत आहेत. जनतेला आवश्यक असणाऱ्या आवश्यक योजना लवकरच प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहेत. आयुक्त सुनील पवार यांच्या नियोजनामुळे महापालिका क्षेत्रात विकास कामांना गती मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री नाम. सुरेश भाऊ खाडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे शिवाय खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, सभागृह नेत्या भारती दिगडे, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान याच्यासह सर्व सन्मानीय पदाधिकारी, नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. प्रशासन म्हणून यासाठी उपआयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.