महापालिकेच्या दंडानंतर हमेशा सेल कडून प्लास्टिक ऐवजी पिशव्यांचा वापर
महापालिकेच्या दंडानंतर हमेशा सेल कडून प्लास्टिक ऐवजी पिशव्यांचा वापर : ग्राहकांना देतात प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा सल्ला
सांगली : महापालिकेच्या दंडानंतर मारुती रोडवरील हमेशा सेलने प्लास्टिक ऐवजी आता शासनमान्य पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना ते प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा सल्लाही देत आहेत. हमेशा सेलच्या या प्रबोधनाचे महापालिकेने कौतुक केले.
महापालिकेकडून बंदी असणाऱ्या सिंगल युज प्लास्टिकवर कारवाई सुरू आहे. यामध्ये ज्या विक्रेते किंवा आस्थापनेत बंदी असणारे प्लास्टिक सापडेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मारुती रोडवरील हमेशा सेलला महापालिकेने दंड केला होता. या दंडामुळे जागरूक होत या सेलच्या चालकांनी आपल्या सेलमधील सर्व प्लास्टिक पिशव्या महापालिकेच्या स्वाधीन करत प्लास्टिक न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्लास्टिक ऐवजी आता या सेलकडून ग्राहकांना शासनाकडून मान्य असणाऱ्या पिशव्या देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे. हमेशा सेलच्या या प्रबोधनात्मक आणि पर्यावरण पूरक उपक्रमाचे महापालिकेने कौतुक केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.