जयसिंगपूरमध्ये एसायला 10 हजाराची लाच घेताना पकडले
कोल्हापूर : तक्रार अर्जानुसार कारवाई करून मारुती ओमनी गाडी परत मिळवून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील एएसआयला (सहायक उपनिरीक्षक) रंगेहात पकडण्यात आले. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ही कारवाई केली.
सोमनाथ देवराम चळचूक (वय 48 ) असे त्या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदाराने पोलिस ठाण्यात मारुती गाडीबाबत तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार कारवाई करून गाडी सोडवून देण्यासाठी चळचुक त्याच्याकडे सुरुवातीला 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चळचूक याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी दुपारी चळचूक याला 10 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाचे डीवायएसपी सरदार नाळे यांच्यासह पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.