ऍड. प्रमोद भोकरे यांची सांगलीचे जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती
सांगली : सांगलीतील प्रतिथयश वकील आणि सध्याचे सहायक सरकारी वकील ऍड. प्रमोद अंकुश भोकरे यांची सांगलीचे जिल्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाचे उप सचिव प्रवीण कुंभोजकर यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
सध्या अरविंद देशमुख हे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम पहात होते. ऍड. भोकरे सहायक सरकारी वकील म्हणून काम करत होते. अनिकेत कोथळे खून प्रकरणात ऍड. भोकरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. शिवाय त्यांनी अनेक खटल्यात आरोपींना शिक्षा होण्यात त्यांचे युक्तिवाद महत्वपूर्ण ठरले आहेत. ऍड. भोकरे यांच्या जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.