पुण्यातील व्यापाऱ्याची 66 कोटींची फसवणूक
पुणे : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखून पुण्यातील व्यापाऱ्याची तब्बल 66 कोटी 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपींनी अशाच प्रकारे इतर अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत सोहम इम्पेस प्रा. लि. चे दशरथ मच्छिंद्र कोकरे, वर्षा दशरथ कोकरे, महेश रामभाऊ बंडगर, सागर रामभाऊ बंडगर (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड येथील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात सुपारी, काळी मिरीची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील एकाने आरोपी कोकरे यांच्याशी ओळख करुन दिली. कोकरे कस्टम ने जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देतात. यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले.
आरोपी कोकरे याने फिर्य़ादी यांची भेट घेतली. त्यांना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचा बनावट ईमेल दाखवला. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 66 कोटी 33 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर फिर्यादी व्यापारी यांना कोणताही परतावा न देता आरपींनी फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रुगाईकर करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)