Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत क्रांती मोर्चा आक्रमक; बस स्थानक परिसरात पेटवल्या टायरी

सांगलीत क्रांती मोर्चा आक्रमक; बस  स्थानक परिसरात पेटवल्या टायरी 

सांगली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं आंदोलनावेळी  सकल मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चानं सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्याला विविध समाज संघटना, व्यापारी संघटना, श्री शिवप्रतिष्ठान, रिक्षा, पानपट्टी असोसिएशन, हॉटेल संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे.

दरम्यान, आज सकाळी येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात टायर पेटवल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं. मराठा क्रांती मोर्चानं बंद शांततेत पाळण्याचं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण  मिळावं, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी येथील स्टेशन चौकात देण्यात आल्या. 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, OBC आरक्षणातील घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही' सकाळी दहाच्या सुमारास आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. हातात भगवे झेंडे घेत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह सर्व व्यापाऱ्यांनी स्वयं स्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवला. रिक्षा संघटना, हॉकर्स, हातगाडी, पानपट्टी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.