आलिशान कार चोरणाऱ्या सराईतास अटक; विटा पोलिसांची कारवाई
सांगली: विटा येथील एका गॅरेजमधून आलिशान कार चोरणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून पावणेनऊ लाख रूपये किमतीची कार जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
रोहन बिरू सोनटक्के (वय २१, रा. मुरूम, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. २४ आगस्ट रोजी विट्यातील एनएस अटो केअर येथून एक आलिशान कारची चोरी करण्यात आली. याबाबत संतोष भोईटे यांनी फियार्द दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरट्यांना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच तांत्रिक तपास करत संशयित भोसरी (पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला कारसह (एमएच ११ सीजी ४११६) ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मागर्दशर्नाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, विकास जाधव, कॅप्टन गुंडवाडे, अजित पाटील, फारूख मुल्ला आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)