Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज!


नवी दिल्ली: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून या राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तीन राज्यांतील विद्यमान विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे ३ नोव्हेंबर २०२४, २६ नोव्हेंबर २०२४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. या विधानसभांच्या निवडणुका त्यांच्या कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आयोजित करणे आवश्यक आहे. याशिवाय, मतदारसंघांच्या सीमांकनानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील घेतल्या जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचा प्रचंड सहभाग पाहून, आयोगाने जम्मू - काश्मीरमधील मतदार याद्या 1 जुलै 2024 ही पात्रता तारीख म्हणून अद्ययावत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू - काश्मीरविषयी गतवेळच्या पत्रकारपरिषदेत महत्त्वाची टिप्पणी केली होती. जम्मू - काश्मीरमधील मतदारांची लोकसभा निवडणुकीत प्रचंड सहभागाची कहाणी खूप आशादायक आणि प्रेरणादायी आहे. जे लोक लोकशाहीत सहभागी होण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दर्शविते. लोकांसाठी शांततापूर्ण आणि एकजूट राहणे, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांचे भविष्य आणि शासन ठरवणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

१. राज्य : जम्मू आणि काश्मीर

सरकार : राष्ट्रपती राजवट

कार्यकाळ : सरकार २०१८ पासून विसर्जित

अपेक्षित निवडणुका : सप्टेंबर २०२४

२. राज्य: हरियाणा

सरकार : भाजप

कार्यकाळ संपणार : 3 नोव्हेंबर 2024

अपेक्षित निवडणुका: ऑक्टोबर 2024

३. राज्य : महाराष्ट्र

सरकार : भाजप-शिवसेना महायुती

कार्यकाळ संपेल : ८ नोव्हेंबर २०२४

अपेक्षित निवडणुका: ऑक्टोबर २०२४

४. राज्य : झारखंड

सरकार : झारखंड मुक्ती मोर्चा - काँग्रेस सरकार

मुदतीची समाप्ती : ४ जानेवारी २०२५

अपेक्षित निवडणुका : ऑक्टोबर २०२४

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.